Sanvidhan divas.

 (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)



                  संविधान दिवस उपक्रम 

                                                  डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे

                      आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवार ला सायंकाळी पाच वाजता व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी, कळंब या संस्थेमध्ये संविधान दिवसाचे महत्त्व समजण्यासाठी संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी संविधान पुस्तकाचे तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीआई फुले व  भूगर्भ शास्त्रज्ञ पद्मभूषण  वामनराव बापूजी मेत्रे यांच्या फोटोला हार अर्पण करण्यात आले.


 सोबतच मिटकॉन तथा डी आय सी यवतमाळ व व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग व इलेक्ट्रिशन प्लंबिंग या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

 या कार्यक्रमाकरिता श्री विठ्ठलराव बोढाळे नागपूर व सौ कल्पनाताई बोढाळे नागपूर हे उपस्थित होते. तसेच सौ अर्चनाताई भोयर अध्यक्ष कळंब महिला फार्मर प्रोडूसर कंपनी कळंब तथा माजी सरपंच ग्रामपंचायत पार्डी सावळापूर हे उपस्थित होते. तसेच श्री राहुल निवडींग सर ट्रेनर इलेक्ट्रिशियन प्लंबिंग ट्रेड व सौ सुषमाताई धनरे ट्रेनर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ट्रेड हे उपस्थित होते.

सौ अर्चनाताई भोयर यांनी सहकार क्षेत्रामधून महिलांची आर्थिक प्रगती कशी करता येईल तसेच महिलांनी सहकार क्षेत्रातून उद्योगाकडे वळावे व महिलांकरता उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधी याबाबत मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे संचालन सौ प्रिया खसाळे यांनी केले. सौ ज्योती कोटरंगे यांनी स्वागत गीत गायले. सुरुवातीला संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. डॉक्टर सौ माधुरी माणिक केवटे यांनी उद्योजकीय व्यक्तिमत्त्वावर मार्गदर्शन केले. श्री श्रमिक बोभाटे प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थितांचे आभार मानले.




उद्देशिका वाचन व्हिडिओ


 या कार्यक्रमा च्या यशस्वी ते करिता प्रिया काकडे, ज्योती कोराम, दुर्गा गावंडे, रूपाली फुलसे, गायत्री हदगावकर, शुक्राणी बोभाटे, वैशाली निखाडे, नंदा लुटे, अपर्णा कामडी, ज्योती कोटरंगे, दामिनी लोणबळे, पूजा पोलकडे, वैभव कामडी, अविनाश चामलाटे, आनंद फाळे, नितेश राऊत, रोहित गडे, सौरभ नेवारे, स्वप्निल धांदे, संकेत बोटरे, जय प्रजापति, रोहित जोगे, सागर धोंडेकर, विशाल लोणबळे, अविनाश ढोणे, चेतन दाते, इत्यादींनी परिश्रम घेतले.


Comments

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

व्हीजन

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.