Posts

Showing posts with the label #SantBhikajiMaharaj #AmlaKalamb #WarkariParampara #KirtanMaharashtra #ReligiousFestivalYavatmal

संत श्री भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

Image
  लेखिका- डॉ. सौ. माधुरी केवटे. मोबाईल क्र. 9422166944  संत श्री भिकाजी महाराज  जन्मोत्सव सोहळा आमला  तालुका कळंब जिल्हा यवतमाळ  येथे संपन्न झाला. संत श्री योगी भिकाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, आमला तालुका कळंब येथे दिनांक 31 जानेवारी 2026 ला शनिवारी संपन्न झाला.  आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपणारे उत्सव अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आमला, तालुका कळंब येथे संपन्न झालेला श्री संत योगी भिकाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा हा अशाच प्रकारचा भक्ती, श्रद्धा आणि समाजएकतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. या कार्यक्रमाकरिता जन्मोत्सवाच्या तीन दिवस आधी आमला या गावांमधून पायी पायदळ वारी आष्टा या त्यांच्या जन्म गावापर्यंत काढण्यात येते.  या जन्मोत्सवाची खास ओळख म्हणजे जन्मोत्सवाच्या तीन दिवस आधी निघणारी पायदळ वारी . आमला परिसरातील विविध गावांमधून भाविक पायी प्रवास करत संत भिकाजी महाराजांच्या जन्मगावी आष्टा येथे पोहोचतात. हा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आत्मिक शुद्धतेचा, संयमाचा आणि भक्तीचा मार्ग असतो. तीन दिवसांच्या मुक्कामानंतर वारी परत ये...