माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

 कर्मचारी महर्षी भाऊसाहेब

 ओंकार उपाख्य श्री म. वा.

 ओंकार

(Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)

 (श्री मधुकर वासुदेवराव ओंकार)

05 मे 2025 ला वयाची 94 वर्ष पूर्ण करून 95 वा वाढदिवसाच्या निमित्याने श्री म वा ओंकार यांचा संक्षिप्त परिचय
र्श्री म. वा. ओंकार. कर्मचारी महर्षी

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या निर्मिती बरोबरच महाराष्ट्रातील 55000 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणून नव्याने सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये कुठलेही सेवा शर्ती, नियम व अटी नसताना वर्ग केले. हा महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेला पहिला अन्याय. 
या निमित्याने महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करून महाराष्ट्रातील पहिली राज्य सरकारी कर्मचारी युनियनची स्थापना केली.  55000 कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करून घेतल्या.
असे हे कर्मचाऱ्यांचे नेते माननीय श्री म वा ओंकार साहेब यांचे दिनांक 05 मे 2025 ला 95 वा वाढदिवस कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यानिमित्य एक संक्षिप्त परिचय करून देण्यात येत आहे.

संक्षिप्त परिचय 

जन्म - दिनांक 5 मे 1931 वैशाख 1853 संकष्टी चतुर्थी.

 बालपण - झाडगाव तालुका राळेगाव. जिल्हा यवतमाळ येथे शेतकरी कुटुंबात बालपण.

 सातवीपर्यंतच शिक्षण झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले.

 मॅट्रिक - वर्धा येथून 1949  गणित व पदार्थ विज्ञान विषयात प्राविण्यासह उत्तीर्ण.

 पदवी - अमरावती येथे बीएससी. गणित व पदार्थविज्ञान.

 एनसीसी - 1949 ते 53 बी व सी सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण. रेजिमेंटल सार्जंट मेजर.

रिझर्व बँक ट्रेनिंग -

1.  दहा महिने कोटा राजस्थान 1956
2. मार्केटिंग 14 आठवडे पुणे 1964 - 65 

जी डी सी ए - गव्हर्मेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी पुणे 1965

 नोकरी -

1. 1953 ते 55 विज्ञान व गणित शिक्षक शिवाजी हायस्कूल यवतमाळ.
2. 1957 ते 60 नॅशनल एक्सटेंशन सर्विस ब्लॉक चंद्रपूर मध्ये विस्तार अधिकारी सहकार, उद्योग, पंचायत.
3. 1960 ते 62 डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह ऑफिसर ऑडिटर व ऑफिस अटॅच.
4. 1962 ते 66 अधीक्षक जिल्हा परिषद नागपूर.
5. 1965 सहकार अधिकारी शेतकी विभाग जिल्हा परिषद नागपूर.
6. 1966 ते 89 महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कडे डेप्यूटेशनवर. 23 वर्ष संघटनेकडे डेप्यूटेशन वर काम केले.
A. 1966 ते 68 को-ऑपरेटिव्ह ऑफिसर. 
B. 1968 ते 74 सहाय्यक निबंधक सहकार विभाग.
C. 1974 ते 89 उपनिबंधक सहकार विभाग.
7. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन.
1962 ते 74 सरचिटणीस म्हणून काम केले.
 1974 ते 2006 महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष 
1966 ते 91 संपादक भवितव्य मासिक म्हणून जबाबदारी.
8. 1970 ते 2006 अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन समन्वय महासंघ 

9. 1984 ते 90 अध्यक्ष सरकारी कर्मचारी राष्ट्रीय महासंघ. (केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी)
10. 1968 ते 70 संचालक नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 11. 1974 ते 2000 अध्यक्ष अभ्यंकर नागरिक मंडळ नागपूर.
12. सहकारी पतसंस्था व गृह बांधणी संस्थांचे संस्थापक व अध्यक्ष 102 लोक कास्ट घरे प्लॉटसह  6350 रुपयात कर्मचाऱ्यांना बांधून दिली. 
13. 2001 पासून कम्प्युटर अकाउंटिंग. 

14. पुस्तके 

1965 ला जिल्हा परिषद सर्विसेस हाऊ अँड वाय. 
1969 ते 87 भवितव्य पथदर्शक सहा आवृत्ती 36 हजार प्रति. 2007 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे व दीर्घकालीन उपाय 2007 रायझिंग प्राइजेस रीजनस अंड रेमेडीज.

 लेख 

महाराष्ट्रातील 25 प्रमुख वृत्तपत्रात व विभिन्न मासिकात सुमारे बाराशे लेख लिहिले.
 लेखाचे विषय कर्मचारी शेतकरी कामगार राजकीय सामाजिक आर्थिक शिक्षण विषयक. 
16. 2008 मातोश्री वृद्धाश्रम आदासा करिता देणगी जमा करण्याचे कार्य. 
सेवानिवृत्तीनंतर दहा वर्ष स्वतः शेती केली.

Comments

Post a Comment

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

व्हीजन

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.