व्हीजन

 व्हीजन

(Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)

                                              

                                     
                                                      डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे.
                                                        कळंब.   जिल्हा यवतमाळ.                                                                        9422166944


                            प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट ध्येय घेऊन आपल्या जीवनाच्या उद्दिष्ट प्राप्ती करता सतत प्रयत्न करत असतो.  व्यक्ती परत्वे उद्दिष्ट बदलत राहते.  जीवनामध्ये सफलता प्राप्त करणे हा एक ध्यास त्यांच्यामध्ये राहतो कोणत्याही व्यक्तीला असं वाटत नाही की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये रहावे आणि त्यात परिस्थिती सापेक्ष बदल व्हावा ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते. उद्दिष्ट प्राप्ती  करिता  ध्येय निश्चिती करणे महत्त्वाचे आहे परंतु यासोबतच आपला दृष्टिकोन हा त्याकरीता फार मदत करतो, त्याला व्हिजन असे म्हटले जाते. व्हिजन जर आपले चांगले असेल तर ध्येय ठरविणे व ध्येयपूर्ती करणे, उद्दिष्ट पूर्ती करणे सहज साध्य होते.
               आयुष्यामध्ये ज्या लोकांचा दृष्टिकोन हा स्पष्ट होता त्या व्यक्तींनी निश्चित अशी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक, राजकीय क्रांती केलेली आपण बघतो आहे.

थोर सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःचा दृष्टिकोन स्वतः स्पष्टपणे समजून घेतल्यामुळे ते सामाजिक दृष्ट्या क्रांती करू शकले. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला. वेगवेगळ्या प्रकारच्या रुढीपरंपरावर मात केली. स्वतः एक चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण केला. एक उत्कृष्ट कवी, उत्कृष्ट साहित्यिक, समाज सुधारक, बिल्डर,  शिक्षण क्षेत्रातील प्रभुत्व असे विविध पैलू  त्यांच्या दृष्टिकोनात होते. दृष्टिकोन स्पष्ट असल्यामुळे आई सावित्री ची सोबत घेऊन त्यांनी समाजाला एक दिशा दिली. असे कितीतरी उदाहरण आपल्याला देता येईल.

                           डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्वतः शिक्षण घेऊन वेगवेगळ्या पदवी प्राप्त करून समाज उथ्थानासाठी यशस्वी प्रयत्न केले आणि भारतीय संविधान लिहून जगापुढे एक आदर्श निर्माण केला.






                     सिंधुताई सपकाळ यांनी अनाथाची माय म्हणून लौकिक मिळवला. त्या त्यांच्या ध्येयाप्रती प्रामाणिक प्रयत्न करून या पुरस्कारास प्राप्त ठरल्या. ध्येयाचा ध्यास असला की उद्दिष्ट गाठणे सोपे जाते. ध्येय हे दिखाऊ कधीच असू नये ध्येय हे निश्चित असले
पाहिजे. आणि त्याकरता आपला दृष्टिकोन हा व्यापक असला पाहिजे. आपले व्हिजन स्पष्ट असले पाहिजे. म्हणजे मार्ग मोकळा राहतो.


आपल्या महाराष्ट्रातील आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास. लता खरे नामक महिलेने पतीच्या आजारावरील उपचाराकरता मॅरेथॉन जिंकली. कुठलीही सुख सोयी, सुविधा नसताना, कुठलंही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा पूर्वानुभव नसताना. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मॅरेथॉन जिंकून औषधोपचारासाठी निधी उपलब्ध करून घेतला. त्या महिलेचे पतीचा उपचार करून घेणे हे व्हिजन अगदी स्पष्ट होतं.

                  बरेच व्यक्ती एक विचार मनामध्ये ठेवून काम करतात. परंतु दृष्टिकोन स्पष्ट नसल्यामुळे प्रगती साध्य करता येत नाही. त्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन चांगला ठेवून आपल्या जीवनात काय करायचे आहे याची निश्चिती करून मार्गक्रमण करावे.

सर्वांना खूप खूप शुभेच्छा

                           धन्यवाद






Comments

  1. सुंदर

    ReplyDelete
  2. अप्रतिम

    ReplyDelete
  3. अति सुंदर विजन पाहिजे त्याशिवाय उदिस्ट प्राप्त होत नाही, अभिनंदन तुझे माधुरी मॅम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.