गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब
गोसाई महाराज मंदिर तीरझडा, कळंब. जिल्हा यवतमाळ.
(Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)
डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे.
कळंब. जिल्हा. यवतमाळ.
9422166944
श्री क्षेत्र कळंब हे श्री चिंतामणी गणपती मंदिर करीता प्रसिद्ध आहे. कळंब हे गाव यवतमाळ पासून 21 किलोमीटर अंतरावर तर वर्धेपासून 45 किलोमीटर अंतर असून नागपूरवरून 130 किलोमीटर अंतरावर आहे.
श्री चिंतामणी गणपती मंदिर करीता प्रसिद्ध असूनही कळंब परिसरामध्ये इतरही अनेक तीर्थक्षेत्र तथा निसर्गरम्य स्थळ आहेत. त्यापैकीच तीरझडा येथे गोसाई बुवा चे मंदिर हे सुद्धा प्रेक्षणीय आहे.
मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य असून बहुतांश सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. तिरझडा हे गाव कळंबवरून कळंब राळेगाव रस्त्यावर 13 किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी जाण्याकरता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. प्रायव्हेट वाहन करून ऑटो ने किंवा स्वतःच्या वाहनाने जावे लागते.
या मंदिर मध्ये जाण्यासाठी तळाशी असलेल्या प्रवेशद्वारामधून 150 पायऱ्या उंच चढत जावे लागते. सामान्यतः असणाऱ्या पायऱ्यापेक्षा थोड्या उंच पायऱ्या सरळ आहेत. परंतु मंदिर व्यवस्थापनाने पाईपचे कडे केल्यामुळे आधार घेणे आणि चढणे सोपे जाते.
महादेवाची पिंड, नंदी आणि त्रिशूल दर्शन
पायऱ्यांनी चढून जातं जात असताना काही अंतरावर पायऱ्यांच्या उजव्या बाजूला महादेवाची पिंड नंदी आणि त्रिशूल दर्शन घडून येते
मंदिर परिसरात खालच्या मैदानात मोठा एक हॉल बांधण्यात आलेला आहे ज्यामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था व डबे सोबत नेले असल्यास डबे खाण्यास जागा आहे.
मंदिर परिसरामध्ये कुठेही हॉटेल किंवा चहा नाश्त्याची व्यवस्था नाही कारण सदर परिसर हायवे पासून लांब आहे.
🌹🙏🌹
Comments
Post a Comment