DRIVING SAFETY.

ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे पॉईंट्स (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) सध्याच्या काळात वाहन चालवता येणे ही एक आवश्यक बाब झालेली आहे. आवश्यकते सोबतच वाहनाची स्वतःची तसेच रस्त्याची रस्त्यावरील वाहतुकीची जबाबदारी ही आपण सर्वांची आहे. एखादा व्यक्ती बेजबाबदारपणे वाहन चालवत असेल तर इतर वाहन चालकांना त्यापासून धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियमांचे पूर्ण पालन करून वाहन चालवावे. वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहनावरील नियंत्रण पूर्णतः सुरक्षित असते. एखादे वाहन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. म्हणजे मिनिटाला एक किलोमीटर किंवा एक किलोमीटर ला एक मिनिट याप्रमाणे वाहन चालते. जर एखादे वाहन ताशी 80 किलोमीटर प्रतितास वेगाने चालत असेल तर त्याला दहा किलोमीटर जाण्यासाठी 7.5 मिनिटे लागणार. म्हणजे दहा किलोमीटर मध्ये फक्त अडीच मिनिटांचा फरक पडतो. परंतु ताश...