आपले कळंब शहरातील माहिती / शैक्षणिक / अध्यात्मिक / कृषी विषयक / व्यावसायिक /किरायाचे रूम, घर, बंगला, व्यवसायिक जागा, गोदाम / इन्फॉर्मेशन / टेक्नॉलॉजी / ट्रान्सपोर्ट इत्यादी करिता उपयुक्त वेबसाईट.
(Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)
Study material for all ITI student.
पेज वाईस कंटेंट मधील माहिती जाणून घेण्यासाठी MORE टॅब वर क्लिक करा.
मध्ये सुरू होणाऱ्या Project साठी Fitter,welder, Mac GVhinist, Diesel Mechanic, Electrician, Electronics त्वरीत हवे आहेत यामध्ये CNC Operater ना प्राधान्य देणार आहेत पगार सर्व भत्ते मिळून 30 हजार असेल व कोंकण रेल्वेच्या सर्व सुविधा मिळतील तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज करावेत.
जाहिरातीनुसार मुलाखती बेलापूर ऑफिसला घेणार आहेत परंतु आपल्याकडून लिस्ट पाठवली आणि संख्या बऱ्यापैकी असेल तर मुलाखती रत्नागिरी येथे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी Application केले असेल किंवा करणार असतील त्यांनी आपले Resume btri.ratnagiri@dvet.gov.in वर mail करावेत किंवा प्रत्यक्ष आणून BTRI रत्नागिरी येथे लवकरात लवकर जमा करावेत.
महापुरुषांचे कौशल्य विचार हे पुस्तक आयटीआयच्या एम्प्लॉयबिलिटी स्किल या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले असून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उपयुक्त असे आहे.
डॉ. सौ माधुरी माणिक केवटे कळंब जिल्हा यवतमाळ 9422166944 कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) शहरांमध्ये गावांमध्ये वस्त्यांमधून कचरा निर्माण होणे ही एक सामान्य बाब आहे. प्रत्येक घरामधून, व्यवसाय क्षेत्रातून, कारखान्यामधून, हॉटेल्स, भोजनालय, कार्यालय, भाजी बाजार, मंडी, औद्योगिक आस्थापना इत्यादी ही कचरा निर्माण होण्याची ठिकाणे आहेत. कचरा निर्माण होणे ही जरी सामान्य बाब असली तरी नागरिकांच्या असहकार्य, नकारात्मक विचारसरणीमुळे कचरा विकृत स्वरूपात पसरतो व त्याचे व्यवस्थापन करणे संबंधित विभागाला मुश्किल होते. घरातील किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे. कचरा व्यवस्...
कर्मचारी महर्षी भाऊसाहेब ओंकार उपाख्य श्री म. वा. ओंकार (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) (श्री मधुकर वासुदेवराव ओंकार) 05 मे 2025 ला वयाची 94 वर्ष पूर्ण करून 95 वा वाढदिवसाच्या निमित्याने श्री म वा ओंकार यांचा संक्षिप्त परिचय र्श्री म. वा. ओंकार. कर्मचारी महर्षी महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या निर्मिती बरोबरच महाराष्ट्रातील 55000 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणून नव्याने सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये कुठलेही सेवा शर्ती, नियम व अटी नसताना वर्ग केले. हा महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेला पहिला अन्याय. या निमित्याने महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करून महाराष्ट्रातील पहिली राज्य सरकारी कर्मचारी युनियनची स्थापना केली. 55000 कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करून घेतल्या. असे हे कर्मचाऱ्यांचे नेते माननीय श्री म वा ओंकार साहेब यांचे दिनांक 05 मे 2025 ला 95 वा वाढदिवस कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यानिमित्य एक संक्षिप्त परिचय करून देण्यात येत आहे. संक्षिप्त परिचय जन्म -...
शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे. लेखक- स्वर्गीय म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. (2004 मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचकांसाठी चकांसाठी या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.) हा लेख नवराष्ट्र या मराठी दैनिकाने दिनांक 29. 7. 2004 रोजी प्रसिद्ध केला तसेच लोकसत्ता मराठी दैनिकाने दिनांक 30. 7. 2004 रोजी "आत्महत्या शेतकऱ्यांनी थांबवाव्या" हे शीर्षक देऊन प्रसिद्ध केला. माणसाची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक गोची झाली तर तो विचार करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आत्महत्या करतात. लग्नानंतर सासुरवाडीत जाळल्या जाणाऱ्या तरुणींचे अनेक किस्से समोर येत असले तरी काही तरुणी अपेक्षाभंगाने आत्महत्या करीत नसतील असे म्हणता येणार नाही. दुर्धर रोगांचा त्रास सहन करू न शकणारी व्यक्ती ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. स्वेच्छा मरणाची मागणी यामुळेच समोर येत आहे. आजच्या पेक्षाही विपणनावस्थेत यापूर्वी शेतकऱ्यांनी दिवस काढले आहेत. घरी शंभर दीडशे एकराची शेती व पन्नास शंभर तोळ...
आयटीआय पास रोजगार भरती एका नामांकित कंपनीला इलेक्ट्रिशियन, फिटर व बिल्डर या तीन ट्रेडच्या आयटीआय पास उमेदवाराची आवश्यकता आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल फॉर्म भरून पाठवावा. खालील गुगल फॉर्म ची लिंक ओपन करून फॉर्म भरून सबमिट करू शकता. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd1IFsB2nsxcj7RWXmLtygccU6bsFyl9s7xZIO-FpIxf_jy3w/viewform?usp=dialog https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd1IFsB2nsxcj7RWXmLtygccU6bsFyl9s7xZIO-FpIxf_jy3w/viewform?usp=dialog
भरती जाहिरात कळंब जिल्हा यवतमाळ येथे 1. ऑफिस करता मुले मुली एक जागा पात्रता बारावी. संगणक ज्ञान असणे आवश्यक. 2. टू व्हीलर बाइक मेकॅनिक दोन जागा. 3. बाईक वॉटर सर्विसिंग करिता दोन जागा. 4. सेल्स एक्झिक्यूटिव्ह दोन जागा संपर्क मोबाईल क्रमांक 9766319691 9226769497
दिनांक 9 ऑक्टोबर 2025 बुधवार ला श्री चिंतामणी मंदिर कळंब येथून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग. दिनांक 08/10/2025 बुधवार ला श्री चिंतामणी मंदिर मधून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग दिनांक 7 /10/ 2025 मंगळवारी मंदिर मधून निघणारा काकडा परिक्रमा मार्ग.
श्रीराम नवमी महोत्सव. कळंब, जिल्हा यवतमाळ. श्री राम मंदिर कळंब जिल्हा यवतमाळ येथे रामनवमी महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व कळंब ग्रामवासी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. तसेच श्री राम नवमी महोत्सव कार्यक्रमाकरिता सहकार्य करावे असे आयोजन समितीद्वारा कळविण्यात आलेले आहे.
ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग एक. (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) ऑटोमोबाईल क्षेत्र ऑटोमोबाईल क्षेत्र या अंतर्गत विविध वाहनांसंबंधी केले जाणारे व्यवसाय हे होऊ शकते. यामध्ये वाहनाची नियमित केली जाणारी सर्विसिंग, ऑटो इलेक्ट्रिशन वर्क, इलेक्ट्रिशियन वर्क, डेंटिंग पेंटिंग, इंजिन रिपेरिंग, इंजिन रिपेरिंग मेजर, इंजिन रिपेरिंग मायनर, वॉटर सर्विसिंग, टायर पंचर रिपेरिंग, इत्यादी कामाचा समावेश होतो. तशी यापेक्षा आणखी बरेच काम स्वातंत्र्यरित्या करता येतात परंतु मला अपेक्षित असलेल्या कामाची यादी मी या ठिकाणी दिलेली आहे. कोणताही व्यवसाय करण्याकरिता सर्वप्रथम आवश्यकता असते ती व्यावसायिक जागेची कमर्शियल प्लेस. त्यानंतर त्याकरता आवश्यक यंत्रसामुग्री, मशिनरी इत्यादी. रिपेरिंग व्यवसाय असेल तर सुटे भाग, टूल्स, इक्विपमेंट्स इत्यादी. सर्वप्रथम गरज आहे ती आपण करू शकणाऱ्या व्यवसाय निवडण्याची. व्यवसाय संधी व उपलब्धता. आपण जर टू व्हील...
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांची जयंती कार्यक्रम पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला श्री चिंतामणी मंदिर जवळ पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृति गौरव समिती कळंब तथा कळंब ग्रामस्थ यांचा सहभाग होता. या कार्यक्रमांमध्ये माननीय श्री सुरेशराव चोपणे, चंद्रपूर. खगोल अभ्यासक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सोबत माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे, वणी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर, माननीय श्री द्वारकादासजी (दासभाई) सूचक व माननीय एडवोकेट श्री अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष, ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. ...
Rutik
ReplyDelete