म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण

म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) आमचे बाबा ज्यांना महाराष्ट्रभर श्री म. वा. ओंकार म्हणून ओळखतात, वयाच्या ९५ व्या वर्षी, २८ ऑगस्ट २०२५ ला पुढच्या प्रवासासाठी निघून गेले. जेमतेम चार हजार लोकसंख्येच्या झाडगाव या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून इयत्ता आठवी च्या शिक्षणासाठी ते बाहेर पडले ते कायमचेच. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व शेवटी नागपूरला स्थायिक होताना शिक्षक, विस्तार अधिकारी सहकार विभाग असा नोकरीचा प्रवास त्यांनी केला. १९६२मध्ये शासनाने लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलेही नोकरीचे नियम लागू न करता नव्याने स्थापन केलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ढकलले. आजकालच्या कंत्राटी कामगारांसारखी त्यांची परिस्थिती झाली होती. यावेळी बाबांनी महाराष्ट्रभर फिरून सर्व जिल्ह्यामधून कार्यकर्ते गोळा करून ’महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन’ ही संघटना स्थापित केली आणि तब्बल ३५ वर्षे ते अनुक्रमे सचिव आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. वेळोवेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सारखे वेतन, भत्ते व इतर सोयी स...