श्री चिंतामणी गणेश श्री क्षेत्र कळंब जिल्हा यवतमाळ
श्री चिंतामणी गणेशाच्या जागृत वास्तव्याने प्रसिद्धीस असलेले श्री क्षेत्र कळंब जिल्हा यवतमाळ हे जागृत गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे समस्त यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे विदर्भातील प्रसिद्ध गणपती मंदिरापैकी श्री गणेश चिंतामणी मंदिर कळंब नावा नावाजलेले आहे कळंब शहर हे यवतमाळ वरून नागपूर रोडवर 21 किलोमीटरवर आहे वर्धेवरून यवतमाळ रोडवर 45 किलोमीटर तर नागपूर वरून 125 किलोमीटर आहे एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचा थांबा या ठिकाणी दिलेला आहे बस थांब्यावरून अगदी पाईच्या अंतरावर मंदिर आहे स्वतःच्या वाहनाने आल्यास पुर पुरेशी पार्किंगची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाची स्वतःची आहे
श्री चिंतामणी गणेश मंदिर भगवान इंद्र स्थापित असून एक जागृत देवस्थान आहे या मंदिरामध्ये प्रवेशाला जाण्यापूर्वी चार मुखी गणपतीचे दर्शन होते त्यानंतर 30 पायऱ्या जमिनीच्या खाली उतरावे लागतात त्या ठिकाणी गणेश कुंड प्रथम दर्शनी भागामध्ये आहे व त्यासमोरच श्री गणेशाची चिंतामणीची विलोभनीय आकर्षक मूर्ती दृष्टीस पडते श्री गणेशाचे दर्शन मनाला आनंदी करते
मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या बाहेरच चप्पल स्टॅन्ड ची व्यवस्था असून मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतात उजव्या बाजूला हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था असून पिण्याचे पाण्याची सुद्धा चांगली व्यवस्था आहे तसेच उजव्या बाजूलाच देणगी तथा प्रसाद टोकन काऊंटर आहे प्रसादाकरिता रुपये 30 चे टोकन घेऊन प्रसादालयामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे भोजनाची वेळ सकाळी 11 ते दुपारी दोन वाजत पर्यंत aste .
Comments
Post a Comment