Posts

Showing posts with the label #M. W. Onkar

शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे.

Image
  शेतकरी  आत्महत्येचे वातावरण गाव  पातळीवर बंद व्हावे. लेखक- स्वर्गीय म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. (2004 मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचकांसाठी चकांसाठी या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.) हा लेख नवराष्ट्र या मराठी दैनिकाने दिनांक 29. 7. 2004 रोजी प्रसिद्ध केला तसेच लोकसत्ता मराठी दैनिकाने दिनांक 30. 7. 2004 रोजी  "आत्महत्या शेतकऱ्यांनी थांबवाव्या" हे शीर्षक देऊन प्रसिद्ध केला.                         माणसाची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक गोची झाली तर तो विचार करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आत्महत्या करतात. लग्नानंतर सासुरवाडीत जाळल्या जाणाऱ्या तरुणींचे अनेक किस्से समोर येत असले तरी काही तरुणी अपेक्षाभंगाने आत्महत्या करीत नसतील असे म्हणता येणार नाही. दुर्धर रोगांचा त्रास सहन करू न शकणारी व्यक्ती ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. स्वेच्छा मरणाची मागणी यामुळेच समोर येत आहे. आजच्या पेक्षाही विपणनावस्थेत यापूर्वी शेतकऱ्यांनी दिवस काढले आहेत. घरी शंभर दीडशे एकराची शेती व पन्नास शंभर तोळ...

म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण. Onkar M. W. Union leader

Image
 म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) आमचे बाबा ज्यांना महाराष्ट्रभर श्री म. वा. ओंकार म्हणून ओळखतात, वयाच्या  ९५  व्या वर्षी, २८ ऑगस्ट २०२५ ला पुढच्या प्रवासासाठी निघून गेले.   जेमतेम चार हजार लोकसंख्येच्या झाडगाव या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून इयत्ता आठवी च्या शिक्षणासाठी ते बाहेर पडले ते कायमचेच. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व शेवटी नागपूरला स्थायिक होताना शिक्षक, विस्तार अधिकारी सहकार विभाग असा नोकरीचा प्रवास त्यांनी केला.    १९६२मध्ये शासनाने लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलेही नोकरीचे नियम लागू न करता नव्याने स्थापन केलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ढकलले. आजकालच्या कंत्राटी कामगारांसारखी त्यांची परिस्थिती झाली होती. यावेळी बाबांनी महाराष्ट्रभर फिरून सर्व जिल्ह्यामधून कार्यकर्ते गोळा करून ’महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन’ ही संघटना स्थापित केली आणि तब्बल ३५ वर्षे ते अनुक्रमे सचिव आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. वेळोवेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सारखे वेतन, भत्ते व इतर सोयी स...