Posts

Showing posts with the label #शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे.

Image
  शेतकरी  आत्महत्येचे वातावरण गाव  पातळीवर बंद व्हावे. लेखक- स्वर्गीय म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. (2004 मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचकांसाठी चकांसाठी या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.) हा लेख नवराष्ट्र या मराठी दैनिकाने दिनांक 29. 7. 2004 रोजी प्रसिद्ध केला तसेच लोकसत्ता मराठी दैनिकाने दिनांक 30. 7. 2004 रोजी  "आत्महत्या शेतकऱ्यांनी थांबवाव्या" हे शीर्षक देऊन प्रसिद्ध केला.                         माणसाची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक गोची झाली तर तो विचार करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आत्महत्या करतात. लग्नानंतर सासुरवाडीत जाळल्या जाणाऱ्या तरुणींचे अनेक किस्से समोर येत असले तरी काही तरुणी अपेक्षाभंगाने आत्महत्या करीत नसतील असे म्हणता येणार नाही. दुर्धर रोगांचा त्रास सहन करू न शकणारी व्यक्ती ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. स्वेच्छा मरणाची मागणी यामुळेच समोर येत आहे. आजच्या पेक्षाही विपणनावस्थेत यापूर्वी शेतकऱ्यांनी दिवस काढले आहेत. घरी शंभर दीडशे एकराची शेती व पन्नास शंभर तोळ...