ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.
ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग एक.
ऑटोमोबाईल क्षेत्र
व्यवसाय संधी व उपलब्धता.
आपण जर टू व्हीलर सर्विसिंग व्यवसायामध्ये काम करायचे ठरविले तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या यादीमध्ये सर्वप्रथम आवश्यकता असते ती जागेची. त्यानंतर ज्या परिसरामध्ये आपण आहोत त्या ठिकाणी या व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या टू व्हीलर ची संख्या. हाच व्यवसाय करणारे किती व्यावसायिक सध्या त्या परिसरामध्ये काम करत आहेत. ते जर काम करत आहे तर त्यांच्यापेक्षा वेगळा आपण काय सुविधा देणार आहो किंवा आपल्याकडे काय वेगळे स्किल आहे. आपण कोणतं कौशल्य त्या ठिकाणी वापरून ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन आकर्षित करणार आहोत. इत्यादी सर्व बाबी विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते.
व्यवसायाकरिता आवश्यक स्किल व प्रशिक्षण किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव
जो व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे त्या व्यवसायाचा आपल्याजवळ असणारा अनुभव किंवा स्किल या करिता पुरेसा आहे का याची खात्री करून घेणे. जर अतिरिक्त कौशल्याची आवश्यकता असेल तर ते कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करून घेणे. संपूर्ण कौशल्य प्रात्यक्षिकावर आधारित असणे महत्त्वाचे आहे. सर्टिफिकेट वर आधारित प्रशिक्षण या व्यवसायात धोका ठरू शकते.
प्रशिक्षण उपलब्धता
जर उपरोक्त व्यवसायामध्ये आपल्याला व्यवसायिक संधी उपलब्ध उपलब्ध असेल तर त्याचे कौशल्य आत्मसात करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याबाबतचे संपूर्ण स्किल आपल्या हातामध्ये असावे. याकरिता सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून खालील व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्या जाते.
मेकॅनिक डिझेल.
मेकॅनिक मोटर वेहिकल.
मेकॅनिक ट्रॅक्टर.
फार्म मेकॅनिक.
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स.
इत्यादी व्यवसाय मधून एक वर्ष ते दोन वर्ष कालावधीत चे प्रशिक्षण घेता येते
याशिवाय डी. आय. सी. मिटकॉन, विश्वकर्मा योजना, पीएमकेविवाय, एनएसडीसी इतर व्होकेशनल कोर्सेस मधून सदर प्रशिक्षण घेऊन कौशल्य प्राप्त करता येते
वर्षभरामध्ये विविध शासकीय एजन्सी मार्फत अथवा संस्थामार्फत एक महिना कालावधीचे ते तीन महिने कालावधीपर्यंतचे विविध कोर्सेस विना शुल्क आयोजित केले जातात. त्यामधूनही कौशल्य प्राप्त करता येते.
सदर व्यवसायाकरिता आवश्यक बाबी
सर्विसिंग किंवा रिपेरिंग सेंटर मॉडेलची संकल्पना
या संकल्पनेनुसार घरातील अंगणात किंवा पडवीच्या छोट्याशा जागेमध्ये एक बाईक ठेवणे इतकी जागा असल्यास हे शॉप आपल्यास ला सुरू करता येते. सर्व टूल्स इक्विपमेंट्स परचेस करून वॉटर सर्विसिंग मशीन आपल्याला घ्यावी लागेल. ज्या ठिकाणी आपल्याला सुरू करायचे आहे त्या परिसरामध्ये किमान 100 टू व्हीलर धारक आपल्या संपर्कात असावे. त्यांच्याशी व्यक्तिशः भेटून आपण सुरू करत असलेल्या व्यवसायाची माहिती द्यावी. त्यांचे संपर्क क्रमांक, वेहिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी व मॉडेल याबाबतची माहिती जाणून घ्यावी. एकदा ते वेहिकल आपल्याकडे सर्विसिंगला आल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे नोंद करून ठेवावी. किलोमीटर रीडिंग, नेक्स्ट सर्विसिंग ड्यु किलोमीटर रीडिंग किंवा तारीख इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश असावा. दिवसाला किमान दोन गाड्या सर्विसिंगला मिळाल्यास तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत मजुरी आपल्याला मिळू शकते. पार्ट टाइम किंवा सायंकाळच्या वेळेला हे काम आपण करू शकतो. ऑन कॉल सर्विस असल्यामुळे आपल्याला प्रतीक्षा करायची गरज नाही किंवा थांबून राहायची गरज नाही. या सर्विसिंग करता आपल्याकडे सर्विसिंग करता येणारे टू व्हीलर याची माहिती असेल तर त्या कंपनीचे त्या मॉडेलला लागणारे फास्ट कंजूमिंग स्पेअर पार्ट आपण स्वतःकडे उपलब्ध ठेवू शकतो. यामध्ये इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, हेडलॅम्प, टेललॅम्प, इंडिकेटर, ब्रेक केबल, क्लच केबल, स्पार्क प्लग, नट बोल्ट, स्विचेस इत्यादी चा समावेश होतो. म्हणजे आपली धावपळ होणार नाही. जर वाहनाचे मेजर रिपेरिंग असेल तर लोकल मार्केट मधून किंवा इतर ठिकाणावरून आपल्याला स्पेअर्स मागवून रिपेअर ची पूर्तता करता येऊ शकते.
अयशस्वीतेची कारणे आणि उपाय
याबाबतचे प्रशिक्षण सुविधा किंवा इतर मार्गदर्शन किंवा माहिती आवश्यक असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज द्वारे संपर्क करू शकता.
माणिक अनंतराव केवटे
यंत्र अभियंता
9226769497
Khup chhan mahiti dili sir
ReplyDeleteधन्यवाद
DeleteExcelant
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhup chhan mahiti. Bhau
ReplyDeleteआभारी आहोत
Deleteखूप महत्वपूर्ण माहिती दिली सर, नक्कीच आपण नोंदविलेली मुद्दे एक यशस्वी उद्यम होण्यास मदत करतील, खूप खूप धन्यवाद व शूभेच्छा...
ReplyDeleteधन्यवाद विश्वजीत
Delete👌🏻👌🏻💐🙏🏻
ReplyDeleteThanks
DeleteAwesome sir great
ReplyDeleteThanks Sir
DeleteKhup chan mahiti dili sir
ReplyDeleteThanks
Deleteसर तुमच्या मार्गदर्शनाखाली जो विद्यार्थी प्रशिक्षण घेईल तो कधीच रीकामा राहनार नाही।
ReplyDeleteतुमचे मार्गदर्शना मुंडे आज आमही ईथ पर्यन्त पहुंचलो। असाच आशीर्वाद आमचावर सदैव राहु दया।
धन्यवाद सर
Thanks
DeleteVery useful information sir....
ReplyDeleteThanks
DeleteNice information
ReplyDeleteThanks
Deleteमाहिती असावी अशी माहिती आहे. खुपच छान 👌 👌 👌
ReplyDeleteThanks
DeleteVery Good
ReplyDeleteउपयुक्त व महत्वपूर्ण माहिती👌👌
ReplyDelete