पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे यांची जयंती कार्यक्रम
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे
यांची जयंती कार्यक्रम
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे
दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला श्री चिंतामणी मंदिर जवळ पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृति गौरव समिती कळंब तथा कळंब ग्रामस्थ यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमांमध्ये माननीय श्री सुरेशराव चोपणे, चंद्रपूर. खगोल अभ्यासक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते सोबत माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे, वणी जिल्हा यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर, माननीय श्री द्वारकादासजी (दासभाई) सूचक व माननीय एडवोकेट श्री अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष, ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री सुरेशरावजी चोपणे यांनी भूगर्भ हालचाली विज्ञान आणि पर्यावरण या विषयावर जयंती कार्यक्रम प्रसंगी अभ्यासपूर्ण सखोल मार्गदर्शन केले तसेच माननीय श्री महादेवराव खाडे यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयावर विविध प्रयोग सादर करून मार्गदर्शन केले व विविध प्रयोगाद्वारे त्यामागील सत्य आणि विज्ञान समजावून सांगितले.
प्रमुख उपस्थिती असलेले माननीय श्री अरुणराव मेत्रे व
श्री द्वारकादासजी सूचक यांनी मार्गदर्शन केले व माननीय प्राध्यापक श्री रुस्तमजी अंभोरे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अध्यक्ष पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती कळंब यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन माननीय श्री बसवेश्वरजी माहुलकर सचिव श्री चिंतामणी मंदिर ट्रस्ट कळंब व माननीय प्राध्यापक श्री अतुलजी सारडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार माननीय श्री प्रशांतजी डेहनकर उद्योजक तथा संशोधक कळंब यांनी मानले.
सचिव, श्री चिंतामणी देवस्थान ट्रस्ट कळंब जिल्हा यवतमाळ.
या कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अध्यक्ष पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती कळंब यांचे स्वागत करताना माननीय श्री अशोकभाऊ उमरतकर ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते कळंब.
माननीय एडवोकेट श्री अरुणरावजी मेत्रे अध्यक्ष ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ यांचे स्वागत करताना माननीय डॉक्टर श्री चंद्रशेखर चांदणे साहेब कळंब.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री सुरेशरावजी चोपने साहेब खगोल अभ्यासक, चंद्रपूर यांचे स्वागत करताना माननीय श्री चंद्रशेखरजी चांदोरे बांधकाम सभापती नगर परिषद कळंब.
माननीय प्राध्यापक श्री महादेवरावजी खाडे. प्रमुख वक्ते वणी यांचे स्वागत करताना माननीय श्री राजूभाऊ भोयर कळंब माजी सदस्य श्री चिंतामणी देवस्थान ट्रस्ट कळंब.
![]() |
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री द्वारकादास जी सुचक यांचे स्वागत करताना माननीय श्री रंगरावजी मालवीय. |
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते तथा अतिथींच्या सत्कार सोहळ्याचे संचलन करताना माननीय प्राध्यापक श्री अतुलजी सारडे मुख्य संयोजक पद्मभूषण वामनराव मेत्रे वृत्ती गौरव समिती कळंब.
माननीय प्राध्यापक श्री महादेवराव खाडे यांचा शाल व श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करताना माननीय श्री रमेशभाऊ मेत्रे, माजी पोलीस पाटील कळंब व माननीय श्री बसवेश्वर भाऊ माहुलकर कळंब.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री सुरेशरावजी चोपणे सर चंद्रपूर, खगोल अभ्यासक यांचा शाल व श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती भेट देऊन सत्कार करताना माननीय मनिषाताई काटे / भोसले, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, युवती प्रमुख (माननीय शरदचंद्रजी पवार गट) व माननीय श्री विनोदभाऊ आसुटकर कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर तथा सचिव, पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती.
या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना पद्मभूषण वामनराव मेत्रे स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष माननीय श्री रुस्तमजी अंभोरे सर
या कार्यक्रम प्रसंगी वक्ते माननीय श्री महादेवराव खाडे सर वणी जिल्हा यवतमाळ उपस्थित मार्गदर्शन करताना.
या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय एडवोकेट श्री अरुणरावजी मेत्रे, अध्यक्ष ज्योतिबा दिन बंधू कल्याण मंडळ यवतमाळ तथा मार्गदर्शक पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती कळंब.
या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय श्री द्वारकादासजी सुचक अध्यक्ष व्यापारी असोसिएशन कळंब.
या कार्यक्रम प्रसंगी सर्वांचे आभार मानताना माननीय श्री प्रशांतजी डेहनकर उद्योजक, संशोधक तथा उपाध्यक्ष पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती कळंब.
कार्यक्रमाकरिता उपस्थित जनसमुदाय.
पद्मभूषण वामनराव बापूजी मेत्रे स्मृती गौरव समिती कळंब ही कार्यकारणी दरवर्षी एक वर्षाकरिता 14 फेब्रुवारीला त्यांच्या जयंतीदिनी नव्याने घोषित करण्यात येते. यावर्षी करिता 14 फेब्रुवारी रोजी माननीय श्री अरुणराव मेत्रे यांचे मार्फत ही कार्यकारिणी 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत एक वर्षाकरिता खालील प्रमाणे कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
Comments
Post a Comment