श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

 श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार.

(Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)


                                                        

.                                                    डॉ. सौ. माधुरी माणिक केवटे.

                                                        कळंब.   जिल्हा यवतमाळ.                                                                        9422166944



सत्कार स्वीकारताना श्री अविनाशपंत शेषरावजी मेत्रे. कळंब जिल्हा यवतमाळ
                                                                             
                                                               

           श्री अविनाशपंत शेषरावजी मेत्रे, कळंब, जिल्हा यवतमाळ. यांचा महात्मा फुले शिक्षण संस्था, नागपूर यांचे वतीने प्रगतिशील तथा प्रयोगशील शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला.


गौरव प्रमाणपत्र

         श्री अविनाशजी बऱ्याच आधीपासून शेतीमध्ये विविध प्रयोग करत आले. फळबागांमध्ये संत्रा मोसंबी तथा डाळिंब असे बहुवर्षयु पिके घेतली.

        तसेच अनेक वर्ष केळीचे सुद्धा उत्पादन घेतले. कोणतेही नवीन उत्पादन घेत असताना त्याबाबतची संपूर्ण माहिती उत्पादक शेतकऱ्यांकडून तसेच कृषी विभागाकडून जाणून घेऊन त्यावर स्वतः अध्ययन करून उत्पादन कशाप्रकारे आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त मिळवता येईल त्या पद्धतीने त्याची लागवड करणे. यावर त्यांचे प्रभुत्व आहे. 

           शेती हा संपूर्ण परावलंबी व्यवसाय असूनही त्यांनी त्यामधील संभाव्य धोके ओळखून शेती केली व करत आहेत. शेतीमधील पाण्याचा दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, किडींचा प्रादुर्भाव तसेच शेतमजुरांची समस्या यावर पर्यायी व्यवस्थापन ताबडतोब मिळवणे हे शेतकऱ्यांचे प्रमुख कर्तव्य समजतात. 

            भाजी उत्पादनामध्ये उत्कृष्ट नियोजन त्यांचे असते. कोणत्या सीजनमध्ये कोणत्या भाजीचे उत्पादन घ्यायचे व कुठे मार्केट उपलब्ध आहेत. त्यानुसार भाजीपाला लागवड करून आठवड्याचा कृषी खर्च त्यामधून कसा मिळवता येईल याचे ते नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करतात.

              शेती व्यवसायासोबतच सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात किंवा  मदत करतात. आजपर्यंत त्यांना कृषी विभागाकडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषीमाल उत्पादना सोबतच नेहमी  दुग्ध उत्पादन हेही सुरू असते. 

               सामाजिक क्षेत्रामधील बांधिलकी जोपासत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही ते अग्रेसर आहेत. कळंब येथील श्री चिंतामणी एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवण्यात येत असलेल्या चिंतामणी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे ते एक यशस्वी संचालक आहेत.

                      अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या श्री अविनाशपंत शेषरावजी मेत्रे यांचा महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर यांनी त्यांच्या प्रयोगशील शेतकरी म्हणून सत्कार केला त्यांचे खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रम प्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणराव पवार, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाळकर, ज्वालाताई धोटे, प्रा. डॉ. अभिजीत  बोथले, श्री पंकज कुरळकर, शरद चांदोरे, राजेंद्र पाटील, अजय गाडगे, राजेंद्र कठाळे कळंब इत्यादी मान्यवर उपस्थित होते

  त्यांच्या शेतीतील प्रयोगाला व प्रगतीला आमच्या खूप खूप शुभेच्छा.

Comments

Post a Comment

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

व्हीजन

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.