संत श्री भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

 
लेखिका- डॉ. सौ. माधुरी केवटे.
मोबाईल क्र. 9422166944 










संत श्री भिकाजी महाराज

 जन्मोत्सव सोहळा आमला

 तालुका कळंब जिल्हा यवतमाळ

 येथे संपन्न झाला.




संत श्री योगी भिकाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, आमला तालुका कळंब येथे दिनांक 31 जानेवारी 2026 ला शनिवारी संपन्न झाला. 
आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपणारे उत्सव अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आमला, तालुका कळंब येथे संपन्न झालेला श्री संत योगी भिकाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा हा अशाच प्रकारचा भक्ती, श्रद्धा आणि समाजएकतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला.
या कार्यक्रमाकरिता जन्मोत्सवाच्या तीन दिवस आधी आमला या गावांमधून पायी पायदळ वारी आष्टा या त्यांच्या जन्म गावापर्यंत काढण्यात येते. 

या जन्मोत्सवाची खास ओळख म्हणजे जन्मोत्सवाच्या तीन दिवस आधी निघणारी पायदळ वारी. आमला परिसरातील विविध गावांमधून भाविक पायी प्रवास करत संत भिकाजी महाराजांच्या जन्मगावी आष्टा येथे पोहोचतात.
हा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आत्मिक शुद्धतेचा, संयमाचा आणि भक्तीचा मार्ग असतो. तीन दिवसांच्या मुक्कामानंतर वारी परत येते आणि संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होते.
या ठिकाणी जाण्याकरता त्यांना तीन दिवस लावता लागतात. त्यांचा पहिल्या दिवसाचा मुक्काम दुसऱ्या दिवसाचा मुक्काम तसेच तिसऱ्या दिवशी ते आष्टा येथे पोहोचतात. आष्टा इथून सरळ परत येऊन सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने गावांमध्ये त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात. अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये संत श्री भिकाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आमला येथे साजरा करण्यात येतो. याकरिता काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

कीर्तनकार श्री गणेशजी डाखरे महाराज वर्धा


 काल्याच्या किर्तनाकरता श्री गणेश डाखरे महाराज, वर्धा यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री गणेश महाराजांच्या भक्तिमय वाणीतून काल्याचे किर्तन संपन्न झाले. अत्यंत सृजनशील भाषेमध्ये त्यांनी काल्याचे किर्तन जवळपास अडीच ते तीन तासापर्यंत भाविकांना उद्बोधित केले. कौटुंबिक,  सामाजिक, शैक्षणिक,  मुलांना प्रगती पर मार्गदर्शन देणारे तसेच समाजातील सर्व घटकांना उपयोगी पडणारे कीर्तन त्यांनी त्या ठिकाणी संपन्न केले. या कीर्तनातून त्यांनी जीवनाला उपयोगी असे उच्च कोटीचे तत्त्वज्ञान कथन केले.

कीर्तनाचा व्हिडिओ पाहण्याकरिता वर क्लिक करावे



मानवी मनाच्या विविध अवस्था, विचारप्रक्रियेचा विकास आणि जीवनाला योग्य दिशा कशी मिळू शकते यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
 तसेच  मानवी मनाच्या विविध अवस्थांमधून मानवाच्या विचाराचा दृष्टिकोन कसा प्रगत होत राहतो यावरही त्यांनी विशेष्य भाष्य केले. कीर्तनशैलीवर विशेष प्रभुत्व असणारे असे श्री गणेशजी डाखरे महाराज आहेत.


           कीर्तनानंतर श्री भिकाजी महाराजांची आरती झाली. यानंतर लगेच भिकाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थितांना केक तथा काला वाटण्यात आला.
भक्ती आणि आनंद यांचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला.
 यानंतर कार्यक्रमाचा दुसरा टप्पा म्हणजे भिकाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काही मार्गदर्शक जेष्ठ मंडळींना निमंत्रित करून कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे संचालन डॉक्टर सौ माधुरी माणिक केवटे, कळंब यांनी केले. त्यांच्या संचालनामुळे कार्यक्रमाला अतिशय रंगत आली. या कार्यक्रमा ची दीप प्रज्वलनाने सुरुवात करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तसेच या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये ज्यांनी तन-मन-धनाने सहयोग दिला त्यांचे सुद्धा स्वागत आणि आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनिलभाऊ पांडे, अध्यक्ष विदर्भ कुस्तीगीर संघ, यवतमाळ हे होते. ते मूळचे आमला या गावचे असून कुस्तीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त आहे. भारतातील अनेक ठिकाणी त्यांनी कुस्तीमध्ये विजय मिळवलेला आहे. याच कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री रमेशभाऊ लोहकरे माजी पोलीस अधिकारी हे होते. पोलीस खात्यामध्ये अनेक वर्ष सेवा झाल्यानंतर निवृत्तीनंतरचा कार्यकाल त्यांनी आपल्या गावामध्ये शेती करून काढण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने तेही या गावात राहतात. ते सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच माननीय श्री मोरेश्वरराव गावंडे व सौ वंदनाताई गावंडे हेही या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या गावंडे दाम्पत्यांनी आमला या गावांमध्ये स्वतःच्या मालकीची शेतजमीन घेऊन त्या ठिकाणी विठ्ठल मंदिराची उभारणी केली. सदर उभारणी ही त्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या प्रेरणेने केली. त्यांच्याबाबत असे सांगण्यात येते की त्यांचा कोणीही विरोधक नसलेला दांपत्य असा त्यांचा गौरव करण्यात येतो व त्यांच्या आमला या गावातील वास्तव्यामुळे अध्यात्मिक तसेच वारकरी क्षेत्रामध्ये वाढ होऊन गावांमध्ये एकोपा वाढीस लागला आहे.  तसेच श्री माननीय श्री अशोकभाऊ उमरतकर, सामाजिक नेते तथा जिल्हा अध्यक्ष कलावंत सांस्कृतिक मंच यवतमाळ हे उपस्थित होते. माननीय श्री अशोकभाऊ उमरकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. तसेच श्री माणिक केवटे कळंब मेकॅ इंजिनिअर हे सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते व त्यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच महिलांनी मोठ्या संख्येने स्वयंप्रेरित सहभाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर उपस्थित त्यांना उपस्थित त्यांना तसेच ग्रामवासियांना  महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली  उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.




श्री संत योगी भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता तो समाजप्रबोधन, अध्यात्मिक उन्नती आणि ग्रामएकतेचा मजबूत पाया ठरला. अशा उत्सवांमुळे वारकरी परंपरा अधिक दृढ होत असून सामाजिक सलोखा वाढीस लागतो.

या कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता गावातील मान्यवर श्री विनोद भाऊ वाघ,  श्री विशाल भाऊ वाघ, माजी सरपंच आमला ग्रामपंचायत, श्री माधवराव  राजपोले,  सौ शितल विनोद वाघ,  सौ सारिका राजपोले व समस्त अमला ग्रामवासी यांनी परिश्रम घेतले.

जन्मोत्सव सोहळ्यातील क्षणचित्रे खाली दिलेली आहेत.






































Comments

Popular posts

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च. Garbage, waste management.

शिक्षण व्यवस्था : परंपरा, परिवर्तन आणि आजचे वास्तव

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. Onkar M. W. Union leader. Nagpur

शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे.

आयटीआय पास रोजगार भरती.

भरती जाहिरात

ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसाय संधी -भाग 2

श्री चिंतामणी देवस्थान काकडा परिक्रमा मार्ग Shri Chintamani Mandir. Kalamb.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब. Gosai Maharaj. Tirzada. Kalamb.