शिक्षण व्यवस्था : परंपरा, परिवर्तन आणि आजचे वास्तव


शिक्षण व्यवस्था : परंपरा,

 परिवर्तन आणि आजचे वास्तव.



                           आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शासन – सर्वच घटक शिक्षणाबाबत अधिक जागरूक झालेले दिसतात. केवळ नोकरीपुरते शिक्षण न राहता व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे शिक्षण ही आजची गरज बनली आहे. मात्र या परिवर्तनाच्या प्रवासात शिक्षण अधिक सर्वसमावेशक झाले आहे की अधिक खर्चिक आणि गुंतागुंतीचे – हा प्रश्न गांभीर्याने विचारात घेण्याची वेळ आली आहे.

प्राचीन भारतीय शिक्षण परंपरा : गुरुकुल पद्धती 

                              अनादी काळापासून भारतामध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुच्या सानिध्यात राहून शिक्षण घेत असे. या शिक्षणपद्धतीत केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य होते. धनुर्विद्या, गदाविद्या, मल्लविद्या, शस्त्रशास्त्र, औषधशास्त्र, राजकीय शास्त्र, नीतिशास्त्र, सामाजिक जाणीव व अध्यात्मिक शिक्षण – या सर्वांचा समन्वय साधला जात होता.

                               एकाच गुरुकुलात शिक्षण घेतलेले शिष्य पुढे कसे वागतील, याचा निर्णय त्यांच्या वैयक्तिक विचारसरणीवर अवलंबून असे. रामायण आणि महाभारतासारख्या ग्रंथांतून हे स्पष्टपणे दिसून येते. शिक्षण हे मूल्याधिष्ठित असले तरी त्याचा उपयोग सदाचारासाठी होतो की दुराचारासाठी – हे व्यक्तीस्वभावावर ठरत होते.

                       अश्मयुगापासून आधुनिक युगापर्यंत मानवाचा जो विकास झाला, त्यामागे शिक्षणाचीच प्रमुख भूमिका आहे. विकसित प्राणी म्हणून मानवाची ओळख निर्माण झाली ती सातत्याने अध्ययन, निरीक्षण आणि प्रयोगशीलतेमुळे. त्यामुळे कोणत्याही काळात शिक्षणाला दुय्यम स्थान दिले गेले नाही.

                            आधुनिक काळाच्या सुरुवातीला ब्रिटिश राजवटीत भारतीय शिक्षण व्यवस्थेवर मोठा आघात झाला. भारतीय शिक्षण प्रणाली ही वैचारिकदृष्ट्या सक्षम व समाजघटक घडवणारी असल्याने ती ब्रिटिश साम्राज्यविस्तारासाठी अडथळा ठरू शकते, हे ब्रिटिशांनी ओळखले. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय समाजावर वर्चस्व निर्माण करण्याचे धोरण राबवले गेले. याचे परिणाम आजही आपल्या शिक्षण व्यवस्थेवर दिसून येतात.

                         रामायण, महाभारत, चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, भगवद्गीता यांसारख्या महान ग्रंथांची निर्मिती ही तत्कालीन शैक्षणिक प्रगल्भतेचे द्योतक आहे. पुढे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, संत तुकारामांनी गाथा, संत एकनाथांनी भारुडे व गाथा, संत कबीरांनी दोहे लिहिले. या साहित्यनिर्मितीमागे उच्च दर्जाची शिक्षणपरंपरा कार्यरत होती, हे नाकारता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज : कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श

                                महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे कौशल्याधारित शिक्षणाचे जिवंत उदाहरण आहेत. शस्त्रशास्त्र, राजनीती, अर्थनीती, सामाजिक समरसता, बांधकाम तंत्रज्ञान, समुद्री शास्त्र – या सर्वांचा त्यांनी अभ्यास केला. मावळ्यांमधील कौशल्य ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, किल्ले उभारले, आरमार निर्माण केले. आजच्या ‘स्किल डेव्हलपमेंट’ संकल्पनेचा मूळ गाभा त्यांच्या कार्यात दिसतो.

समाजसुधारक आणि शिक्षण

                   महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे साधन बनवले. स्त्री शिक्षणाचा पाया घालून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा विचार केल्यास, शिक्षणाची ताकद काय असते याचे सर्वोत्तम उदाहरण समोर येते. त्यांनी शिक्षणाच्या बळावर संविधानासारखा महान ग्रंथ निर्माण केला. येथे प्रश्न उभा राहतो – हे यश व्यक्तीगत प्रतिभेमुळे होते की तत्कालीन शिक्षण व्यवस्थेमुळे? या दोन्हींचा सखोल अभ्यास आजच्या शैक्षणिक धोरणांसाठी आवश्यक आहे.

                        भारतीय संविधानाने शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून दिला असला तरी आजही अनेक मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. दुसरीकडे, नर्सरीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण प्रचंड खर्चिक झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबांसाठी शैक्षणिक खर्च हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

                              आज शासकीय, जिल्हा परिषद, नगरपरिषद, खाजगी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा, स्टेट बोर्ड, सेंट्रल बोर्ड आणि इंटरनॅशनल बोर्ड – अशी विविधता आहे. मात्र या विविधतेमुळे गुणवत्तेत समानता येण्याऐवजी असमानता वाढताना दिसते. शिक्षण ही सेवा न राहता व्यवसाय बनत चालली आहे.

                             जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण क्षेत्रही मागे राहिलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल साधने, विविध शैक्षणिक साहित्य यांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या सगळ्यात मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक भान आणि नैतिकता यांचा समतोल राखला जातो आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

आधुनिक शैक्षणिक धोरण आणि नव्या दिशा

                               राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) हे भारतीय शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देणारे मानले जाते. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, बहुविषयक शिक्षण, डिजिटल शिक्षणावर भर आणि संशोधनाला चालना – या बाबी धोरणात ठळकपणे मांडल्या आहेत. मात्र धोरणाची अंमलबजावणी ही केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष वर्गखोलीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

शिक्षण खर्च आणि सर्वसामान्य कुटुंबे

                                         आज नर्सरीपासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. फी, पुस्तके, गणवेश, वाहतूक, कोचिंग क्लासेस यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडते. शिक्षण हा मूलभूत अधिकार असतानाही तो हळूहळू श्रीमंतांसाठीच सुलभ होत चालला आहे, ही गंभीर बाब आहे.


महाराष्ट्र : शैक्षणिक (आकडेवारी)

(खाली दिलेली माहिती ही गुगल वरून सर्च केलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.)

महाराष्ट्रातील शैक्षणिक स्थिती (अंदाजे)

एकूण शाळा : १.१० ते १.१५ लाख

विद्यार्थी संख्या : २.३ ते २.५ कोटी

शिक्षक संख्या : ७ ते ८ लाख

शासकीय शाळांचे प्रमाण : सुमारे ६०%

खाजगी (मराठी व इंग्रजी माध्यम) शाळांचे वाढते प्रमाण : ४०% च्या आसपास

                        ही आकडेवारी पाहिली असता शिक्षणाचा व्याप मोठा असला तरी गुणवत्ता, समान संधी व परवडणारा खर्च या बाबींमध्ये अजूनही मोठी दरी असल्याचे स्पष्ट होते.

शिक्षण क्षेत्रातील आव्हाने

गुणवत्तेतील असमानता.

शासकीय शाळांबाबतचा विश्वास कमी होणे.

शिक्षणाचे वाढते खाजगीकरण.

रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षणाचा अभाव.

मूल्यशिक्षण व नैतिकतेचा ऱ्हास.

आवश्यक शैक्षणिक सुधारणा 

शासकीय शाळांचे बळकटीकरण व गुणवत्तावाढ.

शिक्षण सर्वांसाठी परवडणारे करण्यासाठी कडक धोरण.

कौशल्य विकास व स्थानिक गरजांशी जोडलेले अभ्यासक्रम.

शिक्षक प्रशिक्षण व सन्मान.

मूल्याधिष्ठित व भारतीय संस्कृतीशी सुसंगत शिक्षण.


                           भारतीय शिक्षण परंपरा ही केवळ ज्ञान देणारी नव्हे तर व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडवणारी होती. आज गरज आहे ती या परंपरेतील सकारात्मक मूल्ये आत्मसात करून आधुनिक शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्याची. शिक्षण सर्वांसाठी सुलभ, परवडणारे, कौशल्याधारित आणि मूल्याधिष्ठित झाले, तरच खऱ्या अर्थाने ‘शिक्षित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ घडू शकेल.


लेखक

माणिक केवटे, कळंब

मोबाईल : 9226769497 

Comments

  1. खूप छान वास्तव मांडणी

    ReplyDelete
  2. खुप छान वास्तव मांडणी

    ReplyDelete
  3. सर जी खूपच छान. गुरुकुल पासून आजच्या coaching पर्यंत आपण आपले सखोल विचार मांडलेत. खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्या..... 💐💐💐💐🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपले खूप खूप आभार

      Delete
  4. शिक्षण क्षेत्राचा सुंदर आढावा 👏🏻✍️✅🌺

    ReplyDelete
  5. अगदी मार्मिक लेखन

    ReplyDelete
  6. वा!! खूप छान

    ReplyDelete
  7. शिक्षण व्यवस्था बदलणे काळाची गरज आहे टेक्निकल शिक्षण घेऊ भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे व यातून स्वयंरोजगार निर्माण करणे हे देशासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे वा छान लेख लिहिला आहे

    ReplyDelete
  8. प्रदीप आसुटकर20 January 2026 at 23:28

    वा छान लेख

    ReplyDelete
  9. खूप छान

    ReplyDelete
  10. Thank you very much sir for presenting detailed and in-depth scholarly thoughts on the education system 🙏

    ReplyDelete
  11. सटीक आणि वास्तविक

    ReplyDelete
  12. सटीक आणि वास्तविक

    ReplyDelete
  13. Khup chyan abhyas purna mahiti

    ReplyDelete
  14. खूप छान लेख माणिकभाऊ. कौशल्याधारित शिक्षण आजच्या काळाची गरज आहे. आणि ते लहानपणापासून देणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  15. छान, 👌👌उत्तम आशय, वास्तववादी आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. Keep it up. 🙏🙏😌😌

    ReplyDelete
  16. श्री. माणिकराव 🙏🙏 आपल्या लेखणाची धाटणी उत्तम आहे. आपण हा व्यासंग जोपासा. वृद्धिंगत करा.

    ReplyDelete
  17. उत्तम विचार श्रेणी

    ReplyDelete
  18. खुपच छान शिक्षणा बाबत माहिती व वास्तविकता मांडली 🙏🏻

    ReplyDelete
  19. क्या बात हैं सर वाह खूप सुंदर लेख मांडला आहे हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च. Garbage, waste management.

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी. Onkar M. W. Union leader. Nagpur

शेतकरी आत्महत्येचे वातावरण गाव पातळीवर बंद व्हावे.

आयटीआय पास रोजगार भरती.

भरती जाहिरात

ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसाय संधी -भाग 2

श्री चिंतामणी देवस्थान काकडा परिक्रमा मार्ग Shri Chintamani Mandir. Kalamb.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब. Gosai Maharaj. Tirzada. Kalamb.