विवाह समारंभातील अनावश्यक प्रथा
✒️✒️ *मराठी लग्नात पडत
चाललेल्या काही अनावश्यक
प्रथा..*
श्री कैलास अनुसया आदिनाथ जोल्हे.
यवतमाळ
१) मुहूर्तावर लग्न न लावणे.
२) नवरा नवरी ने नाचत बोहल्यावर येणे.
३) मान्यवरांचे स्वागत सत्कार.
४) देवदेवतांच्या किंवा महापुरुषांच्या आरत्या.
५) हार घालताना वधूवरांना उचलून घेणे.
६) नवरा नवरी एकत्र बोहल्यावर येणे.
७) प्री-वेडिंग फोटोशूट आणि त्यातल्या चारचौघात न बघवणाऱ्या फोटोंच लग्नमंडपात जाहीर प्रदर्शन .
८) केक कटिंग.
9) डीजेचा कर्ण कर्कश आवाज.
अजूनही बरंच आहे पण यात बदल केला पाहिजे
लग्न मुहूर्त हा किमान दोन महिने आधी निश्चित केलेला असतो शे पाचशे माणसं ती वेळ साधण्यासाठी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपली सगळी काम बाजूला ठेवून आलेली असतात अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचा वेळ वाया घालवून आपण आशीर्वाद ऐवजी त्यांचे नाराजीचे उद्गारच पदरात बांधून घेत असतो. अगदी देवांना पत्रिका देताना सुद्धा त्या पत्रिकेत मुहूर्त वेळेचा उल्लेख असतो त्यामुळे तेही त्याच क्षणाला उपस्थित असतात असं मान्य तर आम्ही सकाळी अक्षता टाकून घेतल्या ही पळवाट देवांची देखील फसवणूक करणारी ठरते..!🥳🥳🤔😑
✒️ *वरील विषयाशी आपण सहमत असाल तर ही पोस्ट दुसर्या गृपवर फाॅरवर्ड निश्चित करावी..*
किही चुकीचे वाटल्यास या पोस्ट कडे दुर्लक्ष करा हे माझे वैयक्तीक मत आहे.
कैलास अनुसया आदिनाथ जोल्हे.
यवतमाळ
Comments
Post a Comment