जॉब स्कॅम
जॉब स्कॅम
सध्या मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनी बेरोजगार युवकांकरता जॉबच्या जाहिराती पाठवतात. काही कंपनी रोजगार भरतीच्या जाहिराती देत राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नोकर भरतीच्या जाहिरातींचा वर्षाव चालू असतो.
जे युवक सध्या नोकरीच्या शोधात आहे ते अशा जाहिराती वाचून त्या कंपनीशी संपर्क करतात. अशा जाहिराती वाचून संपर्क करत असताना काही वेळेला बेरोजगार युवकांची फसगत होण्याची शक्यता असते. काही कंपनी फक्त नाव चर्चेत राहण्याकरता जाहिराती नोकर भरतीच्या जाहिराती टाकत राहतात. परंतु प्रत्यक्षात किती मुलांचा सिलेक्शन करतात हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे आपला कोणी दुरुपयोग करू नये याकरिता त्या कंपनीकडून आलेल्या जाहिरातीची किंवा कुठल्या एजंट कडून आलेल्या जाहिरातीची सत्यता पडताळूनच आपण भरती मेळावा करिता किंवा नोकरी करिता अर्ज करावा. कुठल्याही कंपनीच्या जाहिरातीला जाण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे व प्रत्यक्ष त्या ठिकाणी मुलाखतीला जाणे हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे जाहिराती खात्री लायक योग्य ठिकाणावरून आलेल्या असल्याचे असल्याची खात्री करून घ्यावी व त्या कंपनीमध्ये कुणी आधी परिचित असल्यास त्यांच्याकडून कामाच्या स्वरूपाची माहिती मिळवावी.
त्यानंतरच मुलाखती करिता जावे जेणेकरून आपली फसगत होणार नाही. बऱ्याच ठिकाणी काही एजन्सी भरतीच्या नावाखाली नोंदणी करून पैशाची मागणी करू शकतात त्या ठिकाणी सुद्धा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment