भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पूर्व प्रशिक्षण
*भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*
सातारा दि. 2 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सीडीसी या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी 20 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 या कालवधीत सीडीसी कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन आणि प्रशिक्षण मोफत आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा. प्रवेशासाठी 0253-2451032 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments
Post a Comment