कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च


     
डॉ. सौ माधुरी माणिक केवटे
कळंब जिल्हा यवतमाळ
9422166944






                                                     

कचरा व्यवस्थापन -

सामान्य बाब असामान्य खर्च 

(Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)     

शहरांमध्ये गावांमध्ये वस्त्यांमधून कचरा निर्माण होणे ही एक सामान्य बाब आहे. प्रत्येक घरामधून, व्यवसाय क्षेत्रातून, कारखान्यामधून, हॉटेल्स, भोजनालय, कार्यालय, भाजी बाजार, मंडी, औद्योगिक आस्थापना इत्यादी ही कचरा निर्माण होण्याची ठिकाणे आहेत.


                कचरा निर्माण होणे ही जरी सामान्य बाब असली तरी नागरिकांच्या असहकार्य, नकारात्मक विचारसरणीमुळे कचरा विकृत स्वरूपात पसरतो व त्याचे व्यवस्थापन करणे संबंधित विभागाला मुश्किल होते. घरातील किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे.

 कचरा व्यवस्थापना करता खालील बाबी विचारात घ्याव्या.

 ■ कमीत कमी कचरा कसा निर्माण होईल याचे व्यक्तिशः नियोजन करावे.

 ■ कंपोस्ट होणारा कचरा व प्लास्टिक कचरा वेगळा ठेवावा.

 ■कंपोस्ट होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन घरगुती पातळीवर करावे.

 ■प्लास्टिक कचरा व्यवस्थित एकत्रित करून कचरा गाडीमध्ये दिल्यास त्यावर प्रक्रिया करून रिसायकल व रियूज करता येतो.

 ■ कचरा घराबाहेर रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला न फेकता नियोजित कचरा कुंडीमध्ये टाकावा किंवा घरच्या डस्टबिनमध्ये जमा करून कचरा गाडीमध्ये द्यावा.

 ■सध्या मार्केटमध्ये छोटे छोटे कंपोस्टिंग युनिट उपलब्ध आहेत. त्याचाही वापर करता येईल.

■ कचरा व्यवस्थापना करता वैयक्तिक पातळीवर तीन R चा प्रभावीपणे वापर करावा.

 ● REDUCE  -  कमीत कमी कचरा निर्मिती व्हावी.

● RECYCLE  -  त्यावर प्रक्रिया करणे.

● REUSE  -  पुनर्वापर करणे. त्यातून नवीन काहीतरी निर्मिती करणे.

         वरीलपैकी पहिला R - REDUCE- रिड्यूस ला महत्त्व दिल्यास अर्धे अधिक काम सोपे होते. वरील सात मुद्दे विचारात घेतल्यास व्यवस्थापन सोपे होते.

◇ कचरा अनियंत्रित पणे रस्त्यावर किंवा कुठेही टाकल्यास शहराचे सौंदर्याला बाधा निर्माण होते.

◇ रस्त्यावर किंवा चौकामध्ये विद्रूपीकरण होते.

◇ विविध साथीच्या रोगामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

◇ हवा, पाणी प्रदूषित होते व दुर्गंध सुटतो.

◇ शहरातील नागरी जीवनावर परिणाम होतो.

◇याशिवाय शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया चांगल्या नसणार हा भाग वेगळा.


        शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या आस्थापना कचरा व्यवस्थापन व नियोजन करतात. त्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका इत्यादीचा सहभाग असतो.

 सर्वसाधारणपणे तालुक्याच्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा विचार केल्यास लाखो रुपये खर्च होतात.

 त्यामध्ये खालील ठळक मुद्दे खर्चाचे आहेत.

 ☆ नगरपरिषद पंचायत सफाई कर्मचारी. वेतन

☆ स्वच्छता सुपरवायझर कर्मचारी. वेतन

☆ स्वच्छता निरीक्षक कर्मचारी. वेतन

 ☆ नगर परिषदेचे संबंधित अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी यांचे वेतन

☆ कचरा उचलण्याचे एजन्सी किंवा ठेकेदार.  (जे निविदा मार्फत नियुक्त केलेले असतात).

☆ इतर अनुषंगिक बाबी.

 इत्यादींचा विचार केल्यास दरमहा लाखो रुपये खर्च होतो. सर्वसाधारणपणे तालुक्याच्या ठिकाणचा खर्च हा 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत महिन्याचा असतो. तर हाच खर्च वार्षिक कोटीच्या वर होतो. जर याचे नियोजन केले तर हा यावर होणारा खर्च कमी करून तो इतर विकास कामाकरिता त्या संस्थेला वापरता येतो.  प्रत्येक वेळी होणारा खर्च, प्रत्येक घटकावर होणारा खर्च हा आपल्या खिशातून होत नाही ही धारणा चूक आहे. शासकीय, निमशासकीय किंवा अप्रत्यक्ष शासनाच्या अधिपत्याखालील आस्थापना यावर होणारा खर्च हा प्रत्येक नागरिकांच्या विविध करांमधून भरणा केलेल्या पैशातूनच होत असतो. म्हणजे शासकीय खर्च हा जनतेच्या पैशातून होणारा खर्च आहे याची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त ठरते. त्याकरिता सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा. बाजारात जाताना सोबत एक पिशवी न्यावी. पर्यावरण पूरक नियोजन असावे. अशा सर्व घटकांचा एकत्रित सर्व नागरिकांनी विचार केल्यास शहर स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही व नियोजन करणाऱ्या आस्थापनेचा खर्चही कमी होईल. 

.                    साधारणतः शासकीय कार्यालय,  बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बसेस, रेल्वे यामध्ये भिंती तसाच इतर बाबींचे विद्रूपीकरण झालेले आढळून येते. त्याला स्वच्छ करण्यामध्ये प्रशासनाचे लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे आपण स्वच्छता कशी राहील याची काळजी घेतली पाहिजे. शेवटी स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी यंत्रणा ही मानवी आहे आणि मानवीय दृष्टिकोनातून विचार केल्यास आपण स्वतः आपल्याकडून उपलब्ध असलेल्या सुविधा ह्या कशा स्वच्छ राहतील व नीटनेटके राहतील याची काळजी घ्यावी. शेवटी स्वच्छते करिता मनुष्यबळाचाच वापर करण्यात येतो. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीने युरीन पॉट मध्ये बेसिनमध्ये किंवा संडासच्या शीट मध्ये खर्रा खाऊन सुपारी थुंकणे, खऱ्याचे प्लास्टिक टाकने हे टाळले पाहिजे. ते काढताना कुण्या तरी व्यक्तीला हातानेच काढावे लागते. मानवीय दृष्टिकोनातून यामध्ये आपण स्वतःहून सुधारणा घडवून आणायला हरकत नसावी.

धन्यवाद

Comments

  1. Review:
    सार्वजनिक ठिकाणातील स्वच्छता आणि मानवी जबाबदारी
    या लेखात स्टेशन, बसस्थानके आणि रेल्वे परिसरातील भिंती व सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण हा गंभीर सामाजिक प्रश्न मांडला आहे. प्रशासन स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करते, परंतु टिकाऊ उपाय नागरिकांच्या सहभागातूनच शक्य आहे, हा लेखाचा मुख्य संदेश आहे.

    लेखात मांडलेला “स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी यंत्रणा ही मानवी आहे” हा दृष्टिकोन प्रभावी ठरतो. कारण, स्वच्छता केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हे तो स्पष्ट करतो. विशेषतः युरीन पॉट, बेसिन किंवा शौचालयात खाऱ्या, सुपारी किंवा प्लास्टिक फेकण्याच्या सवयींवर केलेली टिप्पणी वास्तवदर्शी आणि जागृतीपर आहे.

    एकूणच, लेख सामाजिक जबाबदारी, नैतिकता आणि मानवी संवेदना यावर आधारित असून जनजागृतीसाठी उपयुक्त आहे. भाषाशैली सोपी आणि थेट आहे, त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला सहज समजते. थोडे उदाहरणे आणि आकडेवारी जोडली असती, तर परिणामकारकता अजून वाढली असती.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद विशेष माहिती असल्यास कृपया व्हाट्सअप द्वारे कळवावे मोबाईल क्रमांक 9226769497

      Delete
    2. Very well explained about weast management.

      Delete
    3. खुप छान लेख लिहिला आहे ताई अशी जनजागृती काळाची गरज सुद्धा आहेत. यावर सर्वांनी विचार केलाच पाहिजे 👍👍👍

      Delete
  2. हा सगळा भाग माणसाची सवय आणि शिकवण यावर अवलंबून आहे...

    ReplyDelete
  3. खुपच छान ताई . या बाबत प्रत्येकाने विचार करण्याची आज काळाची गरज आहे . फारच छान .

    ReplyDelete
  4. very nice madam ji

    ReplyDelete
  5. everyone should understand there own responsibility

    ReplyDelete
  6. Very Nice Artical👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम....कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज...

    ReplyDelete
  8. अप्रतिम....कचरा व्यवस्थापन ही काळाची गरज

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती दिली

    ReplyDelete
  10. Vikram Shrikhande6 October 2025 at 07:24

    खूप छान आणि महितीपूर्ण लेख 👍

    ReplyDelete
  11. नमस्कार मॅडम खूपच छान लेख लिहिला आहे हा लेख प्रत्येकाने आवर्जून वाचायला पाहिजे आणि आपल्या स्वतःपासूनच किंवा आपल्या घरापासून कचरा व्यवस्थापन केलं पाहिजे very nice 🙏🙏

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. 3R तत्त्वज्ञानाचे महत्त्व, REDUCE (कमी करणे) या पहिल्या 'R' वर जोर देऊन, कचरा निर्मिती मूळातच कमी केल्यास किती मोठा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा होऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे. हे दूरगामी आणि शाश्वत उपायाचे महत्त्व पटवून देते.

    ReplyDelete
    Replies
    1. आपले खूप खूप आभार.

      Delete
  14. आर्थिक जागरूकता, कचरा व्यवस्थापनावर होणारा लाखो रुपयांचा खर्च हा आपल्याच करातून होतो याची जाणीव करून देणे, हे लोकांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा खर्च वाचवून तो इतर विकास कामांसाठी वापरता येईल हा विचार प्रेरणादायक आहे.

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत आणि विशेषत सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल मानवीय दृष्टिकोन ठेवून 'खर्रा, सुपारी थुंकणे टाळणे' यासारख्या लहान पण महत्त्वाच्या सवयी सुधारण्याची आवश्यकता विनम्रपणे सांगितली आहे.

    ReplyDelete
  17. आपला लेख केवळ समस्या मांडत नाही, तर प्रत्येक समस्येवर उपाय आणि दिशा देतो. 'स्वच्छ शहर व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही' हा आशावाद प्रयत्नांना नवी ऊर्जा देतो.
    चला, आपण सगळे मिळून या विचारांना कृतीत उतरवूया आणि आपल्या शहराला/गावाला खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनवूया!

    ReplyDelete
  18. खुप छान माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts

ऑटोमोबाईल मधील व्यवसाय संधी भाग 1.

श्री अविनाशपंत मेत्रे यांचा सत्कार

माननीय श्री म. वा. ओंकार कर्मचारी महर्षी

व्हीजन

Sanvidhan divas.

गोसाई महाराज मंदिर. तीरझडा. कळंब

श्रीराम नवमी महोत्सव. कळंब.

सारा स्पिन्टेक्स इ. प्रा. ली.