ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे पॉईंट्स.
ड्रायव्हिंग विषयी महत्वाचे
पॉईंट्स
सध्याच्या काळात वाहन चालवता येणे ही एक आवश्यक बाब झालेली आहे. आवश्यकते सोबतच वाहनाची स्वतःची तसेच रस्त्याची रस्त्यावरील वाहतुकीची जबाबदारी ही आपण सर्वांची आहे. एखादा व्यक्ती बेजबाबदारपणे वाहन चालवत असेल तर इतर वाहन चालकांना त्यापासून धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियमांचे पूर्ण पालन करून वाहन चालवावे. वाहनाचा वेग मर्यादित असेल तर वाहनावरील नियंत्रण पूर्णतः सुरक्षित असते.
सर्वसाधारणपणे टू व्हीलर कंपनी त्यांच्या वाहना करिता 45 ते 55 किलोमीटर प्रति तास हा स्पीड शिफारस करतात. जेणेकरून वाहनाचे मेंटेनन्स हे चांगले राहील.
आपण चालवत असलेल्या वाहनाचा वेग हा स्व नियंत्रित असावा. रस्ता चांगला आहे म्हणून किंवा वाहन जास्त वेगाने पळू शकते म्हणून वेग मर्यादेचे उल्लंघन करणे घातक होऊ शकते.
तरी सर्व वाहन चालकांनी प्रामुख्याने दुचाकी वाहन चालकांनी वेगमर्यादेला आवर घालून वाहतूक नियमाचे पूर्णतः पालन करावे. जेणेकरून वाहनाची सुरक्षितता व स्वतःची सुरक्षितता तसेच रस्त्यावरील इतरांची सुरक्षितता जोपासता येईल.1. पहाटेच्या सुमारास म्हणजे रात्री 1 ते 4 प्रवास किंवा ड्रायव्हिंग कटाक्षाने टाळावे , कारण या वेळी खूप झोप येत असते.
2. सलग दोन तासांवर ड्राइविंग करू नये, चुका होऊन अपघात घडू शकतो.
दर दोन तासांनी ब्रेक घ्यावा , तोंडावर पाणी मारावे , चहा किंवा कॉफी घ्यावी.
3. रात्रीचे ड्राइविंग एकट्याने करू नये , शक्यतो सोबत कुणीतरी असावे.
4. दोन हजार किमी पेक्षा अधिक प्रवास असल्यास वाहन सर्विस सेंटर मधून तपासून घ्यावे.
5. रात्रीच्या वेळी ओसाड, अनोळखी ठिकाणी गाडी थांबवू नये.
6. दिवसा देखील लघु शंकेसाठी गाडी थांबवायची वेळ आल्यास सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवावी.
7 गाडीतील डिझेल, पेट्रोल पूर्ण संपायची वाट बघू नये, कायम दहा लिटर टाकीत शिल्लक ठेवावे.
8. हवा शक्यतो सकाळी चेक करावी, स्टेफनी मधील हवा देखील चेक करावी.
9. गाडी पेट्रोल इंजिनाची असल्यास सकाळीच पेट्रोल भरावे.
10. कितीही घाई असल्यास आक्रमक ड्राइविंग करू नये.
11. पुढील पूर्ण रस्ता रिकामा दिसत असेल तरच ओव्हर टेकिंग करावे.

12. वाहनाचा वेग कितीही चांगला आणि रिकामा रस्ता असला तरीही जास्तीत जास्त 80 किमी प्रति तास ठेवावा, कारण कुणीही अचानक मध्ये येऊ शकते.
13. वाहन ब्रेक दाबून नियंत्रित करण्या पेक्षा गिअर डाऊन शिफ्टिंग करून इंजिन ब्रेकिंग वापरून नियंत्रित करणे शिकावे.
14. इतर वाहनांसोबत शर्यत लावणे टाळावे.
15. दोन ट्रक्स च्या मध्ये गाडी चालवू नये, कारण अवजड वाहन पटकन थांबू शकत नाही किंवा वळू शकत नाही. मोठ्या वाहनामध्ये काही ब्लॅक स्पॉट असतात त्या ठिकाणी ड्रायव्हरला गाडी स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
16. डावीकडे किंवा उजवीकडे वळण्या आधी इंडिकेटर नक्की वापरावा.
17. स्टेपनी ची देखील हवा कायम चेक करावी.
18. गाडीत चांगल्या प्रतीचा टॉर्च ठेवावा.
19 गावाबाहेरच्या प्रवासाला निघण्या आधी इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, कुलंट वायफर टॅंक मधील वॉटर यांचे लेव्हल तपासावी, गरज असल्यास ऍड करावे.
20. टायर्सची कंडिशन कायम तपासावी , टायर मध्ये अडकलेले खडे काढून टाकावेत, यासाठी लागणारे उपकरण ऑनलाइन मिळते, यामुळे टायर्स चे आयुष्य वाढते.

21. डिझेल इंजिन असलेले वाहन असेल तर स्टार्टर मारल्यावर लगेच रेस करू नये, एक मिनिट इंजिन आईडल स्पीडवर ठेवावे, तसेच प्रवास संपल्यावर इंजिन लगेच बंद करू नये, एक मिनिट आईडल करून मग बंद करावे.
22. सीट बेल्ट नक्की लावावा कारण लावला नसल्यास एअर बॅग ऑपरेट होत नाहित.
23. गाडी वेगात असताना आपली गाडी आणि पुढील गाडी यात सुमारे 50 फूट अंतर राखावे, अचानक ब्रेक दाबायची वेळ आली तर फायदा होतो.
24. पत्ता विचारावा लागल्यास शक्यतो ट्राफिक पोलीस, पेट्रोल पंप, स्थानिक दुकानदार यांना विचारावा.
25. गाडीची कागदपत्रे , म्हणजे RC book, PUC, Insurance व ड्रायव्हिंग लायसन सोबत कायम ठेवावीत.
26. फास्ट टॅग अकाउंट मधील बॅलन्स चेक करावा.
27. गाडीतील पाण्याच्या बाटल्या साईड कप्प्यात व्यवस्थित ठेवाव्यात, खाली पायात ठेऊ नयेत , बाटली ड्रायव्हरच्या क्लच किंवा ब्रेक खाली आल्यास मोठा अपघात होऊ शकतो.
28. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस लिफ्ट देऊ नये.
29. रात्रीच्या प्रवासात समोर अपघात झालेल्या दिसल्यास सावध व्हावे , गाडी थांबवू नये, पोलिसांना किंवा हायवे पेट्रोल यांना कळवावे , हा लुटायचा ट्रॅप असू शकतो.
30. आपत्कालीन स्थितीत गाडीची काच फोडायची वेळ आल्यास सीटच्या हेडरेस्ट चा वापर करता येतो. हेड रेस्ट चे स्टीलचे बार समोरून टोकदार असतात. ज्यांनी काच फोडणे सहज शक्य होते. शक्यतो मागील बाजूचा काच फोडावा.

माणिक केवटे.
Mech. Engineer.
कळंब जिल्हा यवतमाळ
9226769497

Very good information
ReplyDeleteThanks
DeleteVery nice information
ReplyDeleteThanks
DeleteVery useful information 🙏
ReplyDeleteधन्यवाद
Delete