Posts

Showing posts from September, 2025

कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च

Image
      डॉ. सौ माधुरी माणिक केवटे कळंब जिल्हा यवतमाळ 9422166944                                                       कचरा व्यवस्थापन - सामान्य बाब असामान्य खर्च  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)      शहरांमध्ये गावांमध्ये वस्त्यांमधून कचरा निर्माण होणे ही एक सामान्य बाब आहे. प्रत्येक घरामधून, व्यवसाय क्षेत्रातून, कारखान्यामधून, हॉटेल्स, भोजनालय, कार्यालय, भाजी बाजार, मंडी, औद्योगिक आस्थापना इत्यादी ही कचरा निर्माण होण्याची ठिकाणे आहेत.                 कचरा निर्माण होणे ही जरी सामान्य बाब असली तरी नागरिकांच्या असहकार्य, नकारात्मक विचारसरणीमुळे कचरा विकृत स्वरूपात पसरतो व त्याचे व्यवस्थापन करणे संबंधित विभागाला मुश्किल होते. घरातील किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे.  कचरा व्यवस्...

श्री चिंतामणी गणेश, कळंब.

 https://manikkeote.blogspot.com/p/blog-page.html (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) भगवान श्री चिंतामणी कळंब जिल्हा यवतमाळ येथील पुरातन गणेश मंदिरा बाबतची माहिती देणार व्हिडिओ नुकतेच या पेजवर अपलोड करण्यात आलेले आहेत. यातील लिंक क्लिक करून आपण दोन्ही व्हिडिओ बघू शकता. माणिक केवटे. कळंब, जिल्हा यवतमाळ. https://www.facebook.com/share/v/15zZ6H3Nto/ https://www.facebook.com/share/v/15zZ6H3Nto/

"उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम"

 * उद्योजकीय विकास प्रशिक्षण  कार्यक्रम"  (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ व  Mitcon* द्वारा आयोजित "उद्योजकीय विकास प्रशिक्षण कार्यक्रम" अंतर्गत खालील अभ्यासक्रमाचे आयोजन *व्हिजन एज्युकेशनल अकॅडमी कळंब* येथे करण्यात आलेले आहे  *1.  Home Applainces Repairing.*  हा अभ्यासक्रम *जनरल कॅटेगिरी* करिता उपलब्ध आहे.     *2.  Advance Beauty parlour.*  हा अभ्यासक्रम *एसटी कॅटेगिरी* (अनुसूचित जमाती) करिता उपलब्ध आहे. दोन्ही अभ्यासक्रमाकरिता *प्रवेश निशुल्क* असून प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. 1.टीसी.  2.मार्कशीट.  3.  आधार कार्ड. 4.  पॅन कार्ड. 5.  जातीचा दाखला.  6.  बँक पासबुक झेरॉक्स. 7.  दोन फोटो. संपर्क मोबाईल क्रमांक. 1.  डॉ. सौ. माधुरी केवटे 9422166944.  2. सौ. प्राजक्ता केवटे. 3.सौ ज्योती कोराम. तपेश्वरी मंदिर जवळ. कळंब 7378551504.

म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण

Image
 म. वा. ओंकार: एक पुण्य स्मरण (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा) आमचे बाबा ज्यांना महाराष्ट्रभर श्री म. वा. ओंकार म्हणून ओळखतात, वयाच्या  ९५  व्या वर्षी, २८ ऑगस्ट २०२५ ला पुढच्या प्रवासासाठी निघून गेले.   जेमतेम चार हजार लोकसंख्येच्या झाडगाव या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून इयत्ता आठवी च्या शिक्षणासाठी ते बाहेर पडले ते कायमचेच. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व शेवटी नागपूरला स्थायिक होताना शिक्षक, विस्तार अधिकारी सहकार विभाग असा नोकरीचा प्रवास त्यांनी केला.    १९६२मध्ये शासनाने लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलेही नोकरीचे नियम लागू न करता नव्याने स्थापन केलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ढकलले. आजकालच्या कंत्राटी कामगारांसारखी त्यांची परिस्थिती झाली होती. यावेळी बाबांनी महाराष्ट्रभर फिरून सर्व जिल्ह्यामधून कार्यकर्ते गोळा करून ’महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन’ ही संघटना स्थापित केली आणि तब्बल ३५ वर्षे ते अनुक्रमे सचिव आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. वेळोवेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सारखे वेतन, भत्ते व इतर सोयी स...

कर्मचारी महर्षी म. वा. ओंकार, नागपूर

Image
;">कर्मचारी महर्षी माननीय श्री म. वा. ओंकार (मधुकर वासुदेवराव ओंकार) नागपूर (मुळगाव झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ)   (Read more या टॅब वर क्लिक करून विस्तृत लेख वाचावा)